बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी केल्या २०० सर्जरी आणि १६ कोटी खर्च


सुंदर दिसण्यासाठी अनेक मुली मेक-अप करतात. तर काहीजणी काही शस्त्रक्रिया करुन सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. बॉलीवुडमध्येही अनेक अभिनेत्रींनी यासाठी शस्त्रक्रिया केली आहे. पण सुंदर दिसण्यासाठी, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मुलीने २०० शस्त्रक्रिया केल्या आहेत. बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी तिने १६ कोटींचा खर्च केला आहे. इंग्लंडच्या स्टॅफर्डशायरमध्ये राहणाऱ्या मेरी डेलग्यूडीस हिची बार्बीसारखे दिसण्याची इच्छा होती. ती जेनिफर लोपेजला आपली आयडॉल मानते.

मिररच्या बातम्यांनुसार, ती कोणत्याही एँगलने सुंदर दिसण्यासाठी काहीही करू शकते. ती याबाबत सांगते की माझ्या लहानपणापासून माझे आईवडील मला कुरुप म्हणत होते. मी १७ वर्षांची होती तेव्हा मी स्वतःच बदलण्याचा निर्णय घेतला. त्या दरम्यान मी स्तन शस्त्रक्रिया, जबडाची शस्त्रक्रिया, गालांसारखे शस्त्रक्रिया केली. तीन वर्षांपूर्वी मी माझे नाव बदलून स्टार ठेवले. कारण बालपणी माझे नाव स्टेसी होते. पुढे ती म्हणाली, मी 10 वेळा शाळा बदलली आहे, कोणीही माझे मित्र होऊ शकत नाही. माझे आईवडील फार कडक होते. मी कधीही घरातून बाहेर पडली नाही. एवढेच काय तर आम्ही ख्रिसमस कधीच साजरा केला नाही. मला माझ्या बालपणाचा राग येतो.

डेलग्यूडीस जेव्हा १० वर्षांची होती, तेव्हा तिच्या पालकांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने आई बरोबर राहायला सुरवात केली. आईने तिला वयाच्या १७ व्या वर्षी घरातून बाहेर काढले. वसतिगृह सोडल्यानंतर तिच्याकडे पैसे नव्हते. फक्त दोन जोड्या कपडे तिच्याकडे होते. त्यानंतर तिने काम करणे सुरु केले. ती एक पोल डान्सर बनली आणि शस्त्रक्रियेसाठी पैसे गोळा करण्यास सुरवात केली. तिने इतका पैसा जमा केला की तिने ६ वर्षांनंतर स्वतःचे एक नवीन घर विकत घेतले.

मिररच्या बातम्या नुसार, पैसे जमा केल्यानंतर, डेलग्यूडीसने ओठांची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर, गेल्या दहा वर्षांत तिने २०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. लिप एंड चीक बोटॉक्स, आई ब्रो लिफ्ट, स्किन ट्रीटमेंट, बॉम्ब रिकन्स्ट्रक्शन, ब्रेस्ट इम्प्लांट आणि हेअर ट्रान्सप्लांट यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर पहिले आणि अलिकडचे फोटो टाकले असता लोकांनी तिला ओळखलेच नाही.

Leave a Comment