तुम्हीही शेवंताचा हा लूक पाहून व्हाल फिदा!


प्रेक्षकांना झीमराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने अक्षरशः खिळवून ठेवले आहे. या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले. प्रेक्षक या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंता.

View this post on Instagram

❤️

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on


मालिकेने शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्रीनंतर वेगळच वळण घेतले. फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शेवंताच्या अदांनी घायाळ झाला आहे. शेवंताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला तिच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे.


सोशल मीडियावर देखील अपूर्वा बऱ्यापैकी सक्रिय आहे. अपूर्वाने नुकतेच एका कार्यक्रमाला गेलेल्या तिने परिधान केलेल्या साडीतील फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


अपूर्वा पीच कलरच्या साडीमध्ये खूपच लाजवाब दिसत आहे. चाहते देखील तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. प्रेक्षक आणि चाहते तिच्या या फोटोजवर कॉमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.


शेवंता जितकी मालिकेत मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यातदेखील आहे. शेवंताची व्यतिरेखा साकारल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

Leave a Comment