
नवी दिल्ली – यावर्षी होळी साजरी न करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून याबाबतची माहिती नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणे टाळावे असा सल्ला तज्ञांनी नरेंद्र मोदींना दिला असल्यामुळेच आपण होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सांगितले आहे.
यंदा होळी साजरी करणार नाहीत नरेंद्र मोदी
ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी जगभरातील तज्ञांनी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिल्यामुळे मी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी याआधी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कोरोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण मिळाल्यानंतर लोकांना न घाबरण्याचे त्याचबरोबर एकत्र मिळून काम करण्याचे आवाहन केले होते.
