आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’


इंदूर – मध्य प्रदेशच्या राजकारणात घोडेबाजार सुरू झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते आनंद राय यांनी केला असून काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून 100 कोटींची ऑफर दिल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. सध्याच्या काँग्रेस सरकारमधील आमदारांना खरेदी करून भाजप सरकार पाडण्याचा डाव करत असल्याचे राय यांनी म्हटल्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या ऑफरनुसार, काँग्रेस आमदारांना चार हप्त्यांमध्ये 100 कोटी दिले जाणार आहेत. राय यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या संपर्कात काँग्रेसचे दोन ते तीन आमदार होते. भाजप मागील एका वर्षांपासून कमलनाथ सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यात गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे सरकार पाडण्यात सहकार्य करणाऱ्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासनही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment