जाणून घ्या कोरोनाविषयी पसरलेल्या अफवांचे सत्य

चीननंतर आता कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरातील अनेक देशांमध्ये होत आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. याशिवाय अनेक प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. कोरोना व्हायरसविषयी पसरलेल्या अफवांचे सत्य जाणून घेऊया.

अ‍ॅल्कोहॉल जेलपासून कोरोना व्हायरस नष्ट –

कोणत्याही व्हायरसला तुमच्या शरीरात पोहचण्यासाठी हात हे मुख्य मार्ग असतात. त्यामुळे व्हायरसपासून वाचण्यासाठी हात वारंवार स्वच्छ करावे. तुम्ही यासाठी  अ‍ॅल्कोहॉल असणारे हँड सॅनिटाइजरचा देखील वापर करू शकतात.

अ‍ॅल्कोहॉल जेलपासून काही व्हायरस नष्ट होत नाहीत. मात्र कोरोना व्हायरसची संरचना अशी आहे की, ज्याच्या अ‍ॅल्कोहॉलचा परिणाम होतो. त्यामुळे अ‍ॅल्कोहॉल 60 टक्के असणारे हँड सँनिटाइजर जास्त परिणाम कारक ठरतात.

कोरोना व्हायरस हंगामी फ्लू ?

अनेकांना कोरोना व्हायरसबद्दल अधिक माहिती नाही. अनेकजण याला हंगामी फ्लू समजत आहेत. मात्र हे दोन्ही वेगवेगळे आहेत. कोरोना व्हायरस हंगामी फ्लू पेक्षा अधिक धोकादायक आहे. कोरोना हा मनुष्यात आढळणारा नवीन व्हायरस आहे. याच्याशी लढण्यासाठी शरीरात नैसर्गिक वॅक्सिन नाही.

फेस मास्क –

अनेकजण व्हायरसपासून वाचण्यासाठी फेस मास्कचा वापर करतात. मास्क खोकला आणि शिंकाद्वारे संसर्ग होण्यापासून बचाव करतात. मात्र व्हायरस डोळ्यांद्वारे देखील तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. फेस मास्क अशा लोकांनाच घालणे जरूरी आहे, जे संसर्ग झालेल्या लोकांच्या अधिक संपर्कात येण्याची शक्यता असते.

केवळ वयस्कर लोकांनाच व्हायरसचा संसर्ग ?

अनेक जणांमध्ये हा भ्रम आहे की कोरोना व्हायरस हा वयस्कर लोकांना होतो. चीनच्या वुहान युनिवर्सिटी हॉस्पिटलमध्ये 138 कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींवर केलेल्या अभ्यासात समोर आले की, ज्या वयस्कर लोकांना आरोग्याच्या समस्या होत्या त्यांना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. मात्र हे सत्य नसून युवक व लहान बाळांना देखील या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment