चायना वस्तुंना स्पर्श केल्याने होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग ?

कोरोना व्हायरसमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. अधिकत इलेक्ट्रॉनिक वस्तू चीनमधून येतात. मात्र चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असल्याने या वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. बाजारात आधी जो माल उपलब्ध होता, त्याची विक्री केली जात आहे.

ऑल दिल्ली कॉम्प्यूटर ट्रेडर्स असोसिएशन, नेहरू प्लेसचे अध्यक्ष महेंद्र अग्रवाल म्हणाले की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना चीनवरून आलेल्या सामानाचे पॅकिंग खोलताना काळजी घेण्यास सांगितले आहे. हातमोज्यांचा वापर करण्यास सांगितला आहे. एम्सच्या डॉक्टरांनी देखील चीनवरून आलेल्या सामानांपासून सावध राहिले पाहिजे, असे सांगितले आहे.

चीनवरून येणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तू बंद झाल्याने आधीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

चीनवरून दोन-तीन महिन्यांपुर्वी आलेल्या सामानांचे पॅकिंग खोलताना हातमोज्यांचा वापर केला जात आहे. एखाद्या ग्राहकाला इलेक्ट्रॉनिक वस्तू दाखवायची असेल, तरी देखील त्याचा वापर केला जात आहे. असे होऊ शकते की चीनमध्ये एखाद्या संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्याने वस्तूंचे पॅकिंग केले असावे.

एम्सचे असोसिएट प्रोफेसर डॉ. विजय यांच्यानुसार, चीनवरून आलेल्या सामानांचे पॅकिंग खोलताना हातमोज्यांचा वापर करणे योग्य आहे. कोरोना व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असताना एखाद्या संसर्ग व्यक्तीने सामान पॅक केले असेल तर त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे.