सध्या बाजारात दररोज एकापेक्षा एक चांगले फोन लाँच होत आहे. मोबाईल कंपन्या सॅमसंग, शाओमी, ओप्पो या नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. या स्मार्टफोनमध्ये कंपनी पंचहोल डिस्प्ले, रिअरला चार कॅमरे, पावरफुल प्रोसेसर आणि 8 जीबी पर्यंत रॅम देत आहेत. या महिन्यात देखील असेच काही शानदार स्मार्टफोन लाँच होणार आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.
या महिन्यात लाँच होणार हे शानदार स्मार्टफोन
रिअलमी 6 –
रिअलमीचा हा स्मार्टफोन 5 मार्चला लाँच होणार आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, या फोनमध्ये एचडी डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि 4300एमएएच बॅटरी मिळेल. सोबतच फोनची किंमत 10 हजार ते 16 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. या फोनची खरी किंमत लाँचिंगनंतरच कळेल.
रेडमी नोट 9 –
शाओमीचा हा फोन 12 मार्चला लाँच होणार असून, या फोनमध्ये 4 कॅमेरे, दमदार प्रोसेसर आणि नॅव्हिक नेव्हिगेशन फीचर मिळणार आहे.
आयफोन एसई 2 –
गेल्या अनेक दिवसांपासून हा फोनची चर्चा सुरू आहे. हा फोन 31 मार्चला जागतिक बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. इतर आयफोनच्या तुलनेत या फोनची किंमत कमी असण्याची शक्यता असून, फोनची किंमत 23 हजार रुपयांच्या आजुबाजूला असण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अद्याप लाँचिंग बाबत काहीही माहिती दिलेली नाही.
एमआय नोट 10 –
शाओमनी या स्मार्टफोनला आधी यूरोपमध्ये सादर केले होते. आता कंपनी या स्मार्टफोनला भारतात सादर करणार आहे. या फोनमध्ये 8जीबी रॅम आणि 108 मेगापिक्सल कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने भारतातील लाँचिंगबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही.