महिला दिन : महिला सशक्तीकरणासाठी सरकारच्या महत्वपूर्ण योजना

दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या वर्षीची थीम I am Generation Equality: Realizing Women’s Rights ही आहे. जगभरात सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.  आपल्या देशात देखील महिला सशक्तीकरणासाठी सरकारद्वारे अनेक योजना राबविल्या जातात, याविषयी जाणून घेऊया.

उज्जवला योजना –

देशातील सर्व कुटुंबाना इंधन उपलब्ध व्हावे यासाठी सरकारतर्फे उज्जवला योजना चालवली जाते. या योजनेंतर्गत गरीबी रेषेखालील कुटुंबाना मोफत घरगुती गॅस सिलेंडर दिला जातो. या योजनेत सरकार तेल कंपन्यांना प्रति कनेक्शन 1600 रुपये सबसीडी देखील देते. ग्राहकांना शेगडी स्वतः खरेदी करावी लागते.

वन स्टॉप सेंटर –

ही योजना 1 एप्रिल 2015 ला सुरू करण्यात आली होती. योजना निर्भया फंडशी संलग्न आहे. ही योजना हिंसेचा शिकार झालेल्या महिलांना शरण दिले जाते. या अंतर्गत पोलीस डेस्क, कायदेशीर मदत, वैद्यकिय सेवा देण्याचे काम होते. या योजनेसाठी 181 हा टोल फ्री क्रमांक आहे.

महिला ई-हाट –

या योजनेचा उद्देश घरी असणाऱ्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. या योजनेंतर्गत कोणतीही महिला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. सरकार यासाठी कोणतेही शुल्क घेत नाही.

महिला शक्ती केंद्र योजना –

या योजनेंतर्गत आंगनवाडी केंद्र जिल्ह्याच्या प्रत्येक गावात महिला शक्ती केंद्र स्थापन केले जाईल. या केंद्रांद्वारे ग्रामीण भागातील महिलांना केंद्र सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली जाईल. हे केंद्र ग्रामीण-दुर्गम भागात सुरू केले जातात. यात ट्रेनिंग आणि सामुदायिक भागिदारीद्वारे क्षमता विकासावर भर दिला जातो.

सुकन्या समृद्धी योजना –

जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर ही योजना सर्वोत्तम आहे. बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कोणतीही व्यक्ती 10 वर्षांखालील मुलीसाठी खाते उघडू शकते. या योजनेद्वारे करात सुट देखील मिळेल व चांगले व्याजदर देखील मिळते. कालावधी पुर्ण झाल्यानंतर ज्या मुलीच्या नावे खाते उघडली आहे, तिला संपुर्ण रक्कम मिळेल.

Leave a Comment