तृतीयपंथींयांना हक्काचे घर देणार अक्षय कुमार


आपल्या अभिनयासोबतच सामाजिक कार्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा ओळखला जातो. त्यातच त्याने आता तृतीयपंथीय समाजसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. अक्षयने चेन्नई येथे तृतीयपंथीयांना घरे बांधून देण्यासाठी दीड कोटी रुपयांची मदत केली असून याबाबतची माहिती अभिनेता आणि दिग्दर्शक लॉरेन्स राघवनने दिली आहे.

लॉरेन्स राघवनच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहे. तो तृतीयपंथीयाची भूमिका साकारताना या चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमारचा तृतीयपंथीयांसोबतचा एक फोटो लॉरेन्स राघवनने फेसबुकवर शेअर करुन त्याने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे.

लॉरेन्सने हा फोटो शेअर करताना तुम्हाला ही आनंदाची बातमी सांगताना आनंद होत आहे. भारतात पहिल्यांदा अक्षय कुमारने तृतीयपंथीयांना घरे बांधून देण्यासाठी १.५ कोटीची मदत केली आहे. लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्टद्वारे त्याने ही मदत केल्याचे म्हटले आहे.

यंदा लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्टचे १५ वे वर्ष असून तृतीयपंथीयांसाठी यावर्षी घरे बांधून देऊन हे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. लॉरेन्स ट्रस्टद्वारे जमीन पुरवण्यात आली आहे. तर, घरे बांधून देण्यासाठी फंड जमा करण्याच्या प्रयत्नात असताना अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शूटिंगदरम्यान तो स्वत: या कामासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. आपले आश्वासन पूर्ण करत त्याने १.५ कोटीची मदत केल्याचेही लॉरेन्स यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Leave a Comment