आता रेल्वेत हव्या त्या कोच-सीटवर बसून करता येणार प्रवास

आता प्रवाशांना आपल्या आवडीचा कोच आणि सीटवर बसून प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना प्रत्येक श्रेणीच्या कोचमध्ये किती सीट रिकामे आहेत, याबाबत देखील माहिती मिळणार आहे. सोबतच तुमचे कोच इंजिनपासून किती लांब आहे, याची देखील माहिती मिळेल. यासाठी इंडियन रेल्वे टूरिझम अँड कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) रिझर्व्हेशन चार्टला ऑनलाईन केले आहे.

आता प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि अ‍ॅपवर बुकिंग आणि रिकामे सीट्स ऑनलाईन पाहू शकता. सर्व कोचबाबत सविस्तर माहिती ऑनलाईन मिळेल. तुम्हाला ज्या कोचमध्ये सीट हवी आहे, तेथे तुम्ही बुकिंग करू शकता.

पहिला रिझर्व्हेशन चार्ट रेल्वे सुटण्याच्या 4 तास आधी दिसेल. तर दुसरा चार्ट रेल्वे सुटण्याच्या अर्ध्या तास आधी दिसेल. दुसऱ्या चार्टमध्ये सीटच्या वाटपामध्ये बदल करण्यात येईल..

जर तुमच्या ओळखीची व्यक्ती रेल्वेने प्रवास करत असले तर ऑनलाइन रिझर्व्हेशन चार्टद्वारे त्या कोचमध्ये जागा खाली आहे की नाही हे पाहता येईल. आतापर्यंत केवळ श्रेणीनुसार सीट्स उपलब्ध होत असे. तिकीट बुक केल्यानंतर दुसऱ्या कोचमध्ये रिझर्व्हेशन होत असे.

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर चार्ट्स, वेकेंसीचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तारीख आणि बोर्डिंग स्टेशनची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला रिझर्व्हेशन चार्ट दिसेल.

Leave a Comment