3 सिलेंडर की 4 सिलेंडर इंजिन ? जाणून घ्या कारसाठी कोणते आहे सर्वोत्तम

अनेकदा आपण कार खरेदी करण्यास जातो अथवा कारचे स्पेसिफिकेशन्स वाचतो, त्यावेळी 3 सिलेंडर आणि 4 सिलेंडर असणारे इंजिन कारमध्ये आहे, असे अनेकदा ऐकतो. मात्र कार खरेदी करताना आपल्याला या इंजिनबाबत माहिती नसते. 3 सिलेंडर आणि 4 सिलेंडर इंजिन नक्की काय आहे, त्याबाबत जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

काय आहे कार सिलेंडर ?

कार सिलेंडर इंजिनचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ज्या प्रमाणे कारला इंजिन चालवतात. त्याच प्रमाणे इंजिनला चालवण्यासाठी सिलेंडरची गरज असते. कार इंजिनमध्ये सिलेंडरच्या आकाराचे पिस्टन लावलेले असतात. जेव्हा इंधन आणि हवेच्या मिश्रणाने पिस्टनच्या वरती कंबशन चेंबर पेटते, तेव्हा याला सिलेंडर आणि कनेक्टिंग रॉड्सच्या माध्यमातून खाली घेण्यात येते आणि हे क्रँकशॉफ्टला चालवते. जर तुमच्याकडे 3 सिलेंडर कार असेल, तर सिलेंडर इंजिनला मूव्हमेंट देते.

3 सिलेंडर आणि 4 सिलेंडरची तुलना –

सिलेंडरच्या संख्येचा इंजिनच्या क्षमतेवर परिणाम होतो. 4 सिलेंडर क्रँकशॉफ्टला प्रत्येक 90 डिग्रीच्या रोटेशनवर पॉवर जनरेट करते. तर 3 सिलेंडर इंजिन क्रँकशॉफ्टच्या प्रत्येक 120 डिग्री फिरणारे पॉवर जनरेट करते. दोन्ही इंजिनची पॉवर जनरेट करण्याची क्षमता टायमिंग, टेक्निक, परफॉर्मेंस आणि इंधनाच्या क्षमतेला निर्धारित करते.

Image Credited – Amarujala

3 सिलेंडर इंजिनचे फायदे –

3 सिलेंडर इंजिन 4 सिलेंडरच्या तुलनेत कमी इंजिन खर्च करते. लहान कारमध्ये सध्या 3 सिलेंडर इंजिनच मिळते. कमी सिलेंडर असल्याने खर्च देखील कमी येतो. सोबतच लहान इंजिनमुळे इंटेरियरमध्ये जास्त जागा मिळते.

3 सिलेंडर इंजिनचे तोटे –

कमी सिलेंडर असल्याने इंजिनचा रिसपॉन्स टाइम वाढतो. 4 सिलेंडरच्या तुलनेत 3 सिलेंडर इंजिन अधिक आवाज करतात.

Image Credited – Amarujala

4 सिलेंडर इंजिनचे फायदे –

4 सिलेंडर इंजिन अधिक पॉवर देते व यामुळे अधिक आरपीएम देते. हे इंजिन अधिक रिस्पॉन्सिव्ह असते. जास्त सिलेंडर असल्याने इंजिनची क्षमता देखील वाढते.

4 सिलेंडर इंजिनचे तोटे –

3 सिलेंडर इंजिनच्या तुलनेत हे सिलेंडर इंजिन अधिक महाग आहेत. ज्यामुळे गाडीची किंमत वाढते. सोबतच जास्त सिलेंडर असल्याने मायलेज देखील कमी मिळते.

Image Credited – Amarujala

कोणते इंजिन चांगले ?

दोन्ही इंजिनची तुलना केल्यास, हे दोन्ही इंजिन वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजेनुसार बनविण्यात आलेले आहेत. जर पॉवरसोबत परफॉर्मेंस देखील हवी असेल तर 4 सिलेंडर इंजिन निवडू शकता. जर पहिल्यांदा कार खरेदी करत असाल तर मायलेजसोबत गाडीची किंमत लक्षात घेऊन 3 सिलेंडर योग्य पर्याय आहे.

Leave a Comment