
जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकांरांमध्ये ‘ऑस्कर’ आणि ‘गोल्डन ग्लोब’ सारख्या नामांकित पुरस्कार आपल्या नावे करणारी लेडी गागाची गणती केली जाते. गायनासोबतच अभिनेत्री म्हणूनही लेडी गागा लोकप्रिय आहे. पण ती गेल्या काही काळापासून आपल्या गाण्यांपेक्षा अधिक आपल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत राहू लागली आहे. तिने अलिकडेच एका मुलाखतीत, दिवसाला मी तब्बल ४० सिगारेट ओढते, असे सांगितले.
लोकांना धुम्रपान सोडा म्हणून सांगणारी अभिनेत्री दिवसाला ओढते ४० सिगारेट
जगभरातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींना आपण धुम्रपान करताना पाहिले किंवा ऐकले असेल. मग लेडी गागाने त्यात काय विशेष केले असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. विशेष म्हणजे लेडी गागा लोकांना धुम्रपानापासून लांब राहण्याचे म्हणजेच व्यसनमुक्तीचे धडे देते. याकरिता तिला एका स्वंयसेवी संस्थेने ब्रँड अॅबेसिडर देखील बनवले आहे. या संस्थेच्या माध्यमातून ती लोकांना धूम्रपान न करण्याचा सल्ला देते. त्याचे दुष्परिणाम सांगते. परंतु त्याचबरोबर दुसरीकडे स्वत: मात्र दिवसाला सरासरी ४० सिगारेट ओढते. त्यामुळेच लोका सांगे ब्रह्मज्ञान पण स्वतः कोरडे पाषाण अशा आशयाचे स्टेटस टाकून काही लोक सोशल मीडियाव्दारे तिच्यावर टीका देखील करत आहेत.
