मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


औरंगाबाद – जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे माजी आमदार व मनसेचे विद्यमान औरंगाबाद जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या शेजारी तक्रारदार पीडित व्यक्तीची टपरी होती. त्यांनी ही टपरी काढण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आलेला आहे. औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात या व्यक्तीने हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात लेखी तक्रार नोंदवत त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या तक्रारीबाबत चौकशी केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment