बिल न भरल्याने कापली शाळेची वीज, त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय केले पहा

बीड जिल्ह्यातील एक सरकारी शाळा आपल्या वीजेची गरज स्वतः पुर्ण करत आहे. बीडच्या कुर्ला गावातील जिल्हा परिषद शाळेने 25 हजार रुपये वीजेचे बिल भरले नव्हते. यामुळे वीज विभागाने शाळेची वीज कापली. मात्र यामुळे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील खास गुण समोर आला आहे.

सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी एक छोटी पवनचक्की तयार केली आहे. विज्ञानाचे शिक्षक भाऊ साहेब राणे यांनी विद्यार्थ्यांना पवनचक्की बनविण्यास मदत केली. त्यांनी सांगितले की, यामध्ये सोलर यूनिट लावण्यात आलेले असून, याद्वारे 500 वॉट वीज निर्माण होते. ही पवनचक्की बनविण्यासाठी जवळपास 5 हजार रुपये खर्च आला.

राणे यांनी सांगितले की, शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 188 विद्यार्थी शिकतात. एकेदिवशी सातवीच्या विद्यार्थ्यांना पवनचक्कीद्वारे निर्माण होणाऱ्या उर्जेबाबत शिकवत असताना, काही विद्यार्थ्यांनी याचा प्रयोग शाळेत करायचा का असे विचारले. येथूनच ही कल्पना जन्माला आली व विद्यार्थ्यांनी यावर काम सुरू केले.

Leave a Comment