घरगुती गॅस सिलेंडर 52 रुपयांनी झाला स्वस्त


नवी दिल्ली – घरगुती गॅस सिलेंडर 52 रुपयांनी स्वस्त करून केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. आज म्हणजेच एक मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत.

52 रुपयांनी विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (सुमारे 14.2 किलोग्रॅम) स्वस्त झाला असून 893 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर या महिन्यापासून 841 रुपयांना मिळणार आहे. मागील महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तब्बल 144.50 रुपयांची वाढ झाली होती.

Leave a Comment