काही महिन्यांपुर्वी लागू करण्यात आलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृकता निर्माण होताना दिसत आहे. अनेकदा लोकांच्या तक्रारी असतात की, वाहतूक पोलीस खूपच कठोरपणे वागतात. तसेच चालत्या गाडीची चावी काढली जाते. अनेकदा अशा कारणांमुळे चालक व पोलिसांमध्ये वाद देखील होतात. मात्र पोलीस चालत्या गाडीची चावी काढू शकतात की नाही ? याविषयी जाणून घेऊया.
पोलिसांनी चालत्या गाडीची चावी काढून घेतल्यास…
पोलीस काय करू शकत नाही ?
पोलीस चालत्या गाडीची चावी काढू शकत नाहीत. याशिवाय गाडीला थांबवण्यासाठी चालकाचा हात पकडू शकत नाही व चारचाकी वाहनांसमोर अचानक बॅरीकेट्स लावू शकत नाही.
तुम्ही काय करू शकता ?
जर तुमच्यासोबत वरील गोष्टीप्रमाणे एखादी गोष्टी घडत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. याबाबतची तक्रार तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू शकता. तसेच लेखी तक्रार देऊ शकता. जेणेकरून संबंधीत कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल.
चलान कापण्याचा अधिकार नाही –
कोणत्याही चेकिंग प्वाइंटवर सब इंस्पेक्टरपेक्षा खालील स्तरावरील कर्मचारी चलान कापत असेल, तर तुम्ही तक्रार करू शकता. सब इंस्पेक्टरपेक्षा खालील कर्मचाऱ्याला चलान कापण्याचा अधिकार नसतो.
कोण कापू शकतो चलान ?
कोणत्याही व्यक्तीचे चलान कापण्याचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांव्यतरिक्त केवळ सब इंस्पेक्टर अथवा त्यापेक्षा उच्च अधिकाऱ्याला असतो.
नियमांचे पालन करावे –
तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे पालन केले व सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर घाबरण्याचे काहीही कारण नाही. ट्रॅफिक चलान आणि तुमच्या सोबत चालेल्या चुकीच्या वर्तवणुकीबाबत तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. ट्रॅफिक चलानच्या प्रकरणावर न्यायालयात एका दिवसात सुनावणी होते.