सोशल मीडिया क्रश झाला आहे झोमॅटोचा हा डिलिव्हरी बॉय

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या डिलिव्हरी बॉयचे नाव सोनू असून, तो आता इंटरनेट सेंसेशन झाला आहे.

एवढेच नाही तर झोमॅटो इंडियाने आपल्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो म्हणून देखील सोनूचा फोटो ठेवला आहे.

सोनूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याला त्याच्या कमाईबद्दल विचारण्यात येत आहे व सोनू देखील खूश होऊन हसून त्याचे उत्तर देत आहे. नेटकरी त्याच्या हसण्याचे फॅन झाले आहेत.

कमाईनंतर व्यक्ती त्याला जेवणाबद्दल विचारतो. यावेळी सोनू ऑर्डरमधील जेवण काढून खात नाही व ऑर्डर रद्द झाल्यावर ते खाण्यास मिळते, असे सांगतो.

आणखी एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याला सांगतो की, तू खप प्रसिद्ध झाला आहे. यावर देखील सोनू केवळ हसून उत्तर देतो. त्याच्याबद्दल विचारल्यावर तो सांगतो, मी असाच आहे.

https://twitter.com/desiii__girl/status/1233411399256117248

सोनूचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काहीजण मिम्स देखील शेअर करत आहेत.

Leave a Comment