वैयक्तिक कर्ज घेण्याआधी जाणून घ्या ही संपुर्ण माहिती

अनेकदा आपल्या पैशांची अडचण असल्याने वैयक्तिक कर्ज काढावे लागते. बँकेद्वारे आपल्या वैयक्तिक कर्ज त्वरित मिळते देखील. तुम्ही उपचारासाठी, लग्न, कार्यक्रम, प्रवास अशा अनेक गोष्टींसाठी वैयक्तिक खर्ज घेऊ शकता. मात्र तुम्ही जेवढे कमी कर्ज घ्याल तेवढे परत करणे सोपे जाते. कर्ज त्वरित उपलब्ध आहे म्हणून न घेता, गरज असेल तरच घ्यावे.

Image Credited – Amarujala

 कोणत्या बँकेतून घ्यावे वैयक्तिक कर्ज ?

अनेक बँक दावा करतात की कर्जावरील व्याजदर खूप कमी आहे. ईमेल अथवा मेसेजद्वारे देखील ग्राहकांना कर्ज घेण्यास सांगितले जाते. कोणतेही कर्ज त्वरित न घेता त्याबाबत आधी सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. जी बँक कमी व्याज दरात कर्ज देत असेल, त्याच्याकडूनच कर्ज घ्यावे.

कागदपत्रे –

वैयक्तिक कर्जासाठी तुम्हाला पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्रे लागतील. तसेच तीन महिने अथवा सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट देखील सादर करावे लागेल.

Image Credited – Amarujala

कमी हफ्त्यासाठी (ईएमआय) काय करावे ?

व्याज दरानुसार तुमचा हफ्ता ठरत असतो. व्याज दर कमी असलेल्या बँकेतूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून हफ्ता देखील कमी पडतो.

सिबिल स्कोर –

वैयक्तिक कर्ज हे क्रेडिटच्या वापरावर आधारित असते. यासाठी तुमचा सिबिल स्कोर कर्जासाठी महत्त्वाचा असतो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल, तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळण्यास कोणतीच अडचण होत नाही.

Image Credited – Amarujala

स्कोरनुसार व्याजदार –

क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो ऑफ इंडियानुसार (सिबिल) ठरविण्यात आलेल्या स्कोरनुसार ईएमआय ठरत असतो. तुमचा सिबिल स्कोर जेवढा कमी असेल, तेवढ्या अधिक व्याज दरावर तुम्हाला कर्ज मिळेल.

क्रेडिट स्कोरची माहिती कशी घ्याल ?

तुम्हाला क्रेडिट स्कोरची माहिती घेण्यासाठी www.cibil.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे फॉर्म आणि 550 रुपये भरल्यानंतर तुम्ही सिबिल स्कोर पाहू शकता.

Image Credited – Amarujala

व्याज दरा व्यतिरिक्त अन्य शुल्क –

व्याज दराव्यतिरिक्त ग्राहकांना प्रोसेसिंग शुल्क, फोरक्लोजर शुल्क, पार्ट प्री-पेमेंट शुल्क इत्यादी भरावे लागू शकते.

योग्यवेळी हफ्ता भरणे –

ठराविक कालावधी हफ्ता भरण्यासाठी तुमच्याकडे इमर्जेंसी फंड म्हणून काही रक्कम जमा ठेवावी. आर्थिक संकट असल्यास ही रक्कम फायदेशीर ठरू शकते. नोकरी गेली अथवा आजारी पडला तर अशावेळी ही रक्कम कामास येते.

Leave a Comment