बाजारात येणार वॉशिंग मशीनच्या आकाराची इलेक्ट्रिक कार

फ्रेंच ऑटोमेकर कंपनी सिथोएनने एक छोटी इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. या कारचा आकार एखाद्या वॉशिंग मशीन एवढा आहे. या कारला ‘एमी’ नाव देण्यात आले असून, याची किंमत 6600 डॉलर (जवळपास 4.76 लाख रुपये) आहे. या कारमध्ये दोन जण सहज बसू शकतात. ही कार एका तासात 45 किमी अंतर पार करू शकते.

Image Credited – businessinsider

कंपनीने याला नॉन कॉम्फोर्मिस्ट मोबिलिटी ऑब्जेक्ट म्हटले आहे. या इलेक्ट्रिक कारला 6 किलोवॉटच्या बॅटरीद्वारे पॉवर मिळते. यासोबतच यात 8 हॉर्सपॉवरची मोटार देण्यात आलेली आहे. बॅटरी तीन तासात फुलचार्ज होते व एकदा फुल चार्ज झाल्यावर 70 किमी अंतर पार करू शकते.

Image Credited – businessinsider

या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रान्समध्ये 30 मार्चपासून ऑर्डर घेण्यास सुरूवात होणार आहे. त्यानंतर स्पेन, इटली, बेल्झियम आणि जर्मनीमध्ये कारची विक्री केली जाईल.

Image Credited – businessinsider

या कारचे वैशिष्ट्य म्हणजे 14 वर्षांचे युवक देखील ही कार चालवू शकतात. तर यूरोपच्या अन्य देशात 16 वर्षांवरील युवक ही कार चालवू शकतात. यासाठी लायसन्सची देखील गरज नाही. यूरोपियन वाहन कायद्यांतर्गत एमी इलेक्ट्रिक कारला चारचाकी सायकल श्रेणीत ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Comment