लिपस्टिक गन मागोमाग आले मिरची झुमके


फोटो सौजन्य भास्कर
वाराणसीच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्राचे प्रमुख शाम चौरसिया यांनी महिलांना छेडछाड करणाऱ्या रोमीयोपासून स्वरक्षण करता यावे यासाठी काही दिवसांपूर्वी लिपस्टिक गन तयार केली होती त्यापाठोपाठ आता त्यांनी मिरची झुमके तयार केले आहेत. हे झुमके म्हणजे महिलांसाठी सुरक्षा कवच असल्याचा त्यांचा दावा आहे. हे इव्हटीझिंग डिव्हाइस अगदी दागिन्याप्रमाणे दिसते आणि वापरायलाही ते सोयीचे आहे.

या स्मार्ट झूमक्यातून लाल आणि हिरव्या मिरचीच्या बुलेटचा पाउस पडता येतो. त्यात एक बटन फिट केले गेले आहे. कोणताही धोका जाणवला की महिला हे बटण दाबून छेडछाड करणाऱ्या व्यक्तीवर मिरचीच्या गोळ्या झाडू शकतात. त्याअगोदर बंदुकीचा आवाज येतो त्यामुळे संबंधित व्यक्ती घाबरते आणि महिलांना काही वेळ हाताशी मिळतो. या झुमक्यांना दोन बटणे आहेत. एकातून गोळ्या झाडल्या जातात तर दुसरे बटन दाबल्यास १०० किंवा ११२ नंबर डायल होतो आणि मदत मिळविता येते.

हे झुमके म्हणजे इयरिंग गन कोणत्याही मोबाईलच्या ब्ल्यूटूथशी अॅटॅच करता येते. या झुम्क्याचे वजन कमी आहे आणि लांबी ३ इंच आहे. त्यात ३ इंच लांब आणि ५ एमएमची फोल्डिंग बॅरन गन फिट करता येते. हे झुमके बनविण्यासाठी ४५० रुपये खर्च येतो.

Leave a Comment