100व्या वर्षी या आजीबाई साजरा करत आहेत आपला 25वा वाढदिवस

2020 हे लीप वर्ष आहे व यंदा फेब्रुवारीमध्ये 29 दिवस आहेत हे देखील सर्वांना माहिती आहे. मात्र या दिवशी जन्म झालेल्यांची पंचाईत होत असते. कारण अशा व्यक्तींना केवळ दर 4 वर्षांनीच वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळत असते.

अशाच एक क्लेफ नावाच्या एक आजी आहेत. त्यांचा जन्म होऊन 100 वर्ष झाले असले तर त्या या वर्षी आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

यूकेच्या पोर्ट्समाउथ येथे राहणाऱ्या डोरीस क्लेफ यांचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला. यानुसार 2020 मध्ये त्या 25 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाने देखील त्यांच्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले.

डोरिस यांनी सांगितले की, मी खूप आनंदी आहे. काही बदलल्यासारखे वाटत नाही. केवळ मी फिलोसॉफिकल झाल्यासारखे वाटत आहे. मला आपल्या कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवायचा आहे.

त्या म्हणाल्या की, मी माझ्या संपुर्ण आयुष्यात प्रसिद्ध होण्याची वाट पाहत होते आणि हे अशाप्रकारे झाले आहे.

Leave a Comment