‘खऱ्या’ आयर्न मॅनसोबतचा फोटो आनंद महिंद्रानी केला शेअर

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आपल्या ट्विटर फॉलोअर्ससाठी ते प्रेरणादायी स्टोरीज देखील शेअर करत असतात. आता आनंद महिंद्रांनी खऱ्या आयर्न मॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे.

गुजरातच्या दौऱ्यावर इंडिया आयडिया कॉनक्लेवला संबोधित करण्यासाठी निघालेल्या आनंद महिंद्रा यांनी जगातील सर्वात उंच स्टॅच्यू असलेल्या स्टॅच्यू ऑफ यूनिटाला भेट दिली.

यावेळी आनंद महिंद्रा यांनी स्टॅच्यूसोबतचा फोटो देखील शेअर केला. महिंद्रांनी फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या मौल्यवान आठवणींच्या अल्बमसाठी. खऱ्या आयर्न मॅनच्या पायाजवळ  – मार्व्हल कॅरेक्टरच्या नाही.

आनंद महिंद्रांच्या या फोटो आतापर्यंत 39 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

या फोटोच्या आधी आनंद महिंद्रानी’ शब्दांची गरज नाही’, असे कॅप्शन देत स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा फोटो शेअर केला.

Leave a Comment