तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या सिंघमची वर्णी


आजवर बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बॉलिवूडमध्ये करण्यात आले आहेत. बॉक्स ऑफिसवर यापैकी काही चित्रपटांनी दमदार यश मिळवले आहे. त्यातच आता आणखी एका रिमेकची भर पडणार आहे. तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘कायथी’चाही हिंदी रिमेक लवकरच तयार होणार आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनची मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


याबाबतची माहिती स्वतः अजय देवगनने आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एंटरटेन्मेंटद्वारे करण्यात येणार आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज हे करणार आहे. कोणत्याही मुख्य अभिनेत्रीची या चित्रपटात भूमिका नसणार आहे. तसेच, यामध्ये कोणत्या गाण्याचाही समावेश राहणार नाही. फक्त अ‌ॅक्शनने भरलेला हा चित्रपट असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

अजय देवगन या चित्रपटाव्यतिरिक्त एसएस राजामौलींच्या ‘आरआरआर'(RRR) या चित्रपटातही झळकणार आहे. त्याचबरोबर रोहित शेट्टीच्या आगामी ‘सूर्यवंशी’मध्येही अक्षय कुमारसोबत तो सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment