ही आहे जगातील सर्वात तरुण आजी


फोटो सौजन्य न्यूज १८
ब्रिटन मधील एक २१ वर्षीय युवती नुकतीच आजी झाल्याची बातमी झळकली आहे. मात्र तिला जगातील सर्वात लहान वयातील आजी असे म्हणता येणार नाही. कारण या तरुणीने अगोदरच ज्याला नातवंडे आहेत अश्या ५६ वर्षीय माणसाबरोबर लग्न केले आहे. जगातील सर्वात तरुण आजी बनण्याचा मान रोमानियातील रीफ्फा स्टेनकु या मुलीकडे जातो. ती वयाच्या २३ व्या वर्षात खरी आजी बनली आहे. त्यामुळे तिला मुलगी म्हणणे गैर नाही.

रीफ्फा जिप्सी जमातीची आहे. ही जमात भारतातील लमाण जमातीप्रमाणे भटकी जमात आहे. त्यांच्यात परंपरेनुसार अगदी लहान वयात लग्ने होतात. त्यानुसार रीफ्फाचे लग्न तिच्या वयाच्या १० व्या वर्षीच झाले आणि लगेच एक वर्षात ती आई बनली. तिने मुलीला जन्म दिला आणि या मुलीचे लग्नही ११ व्या वर्षी झाले. या मुलीलाही लगेच मुलगा झाला त्याचे नाव लॉयन आहे.

विशेष म्हणजे लॉयन झाला तेव्हा रीफ्फा २३ वर्षाची होती. आता लॉयनचा विवाह सुद्धा ठरविला गेला असून त्याची बायको आठ वर्षाची आहे. रीफ्फा इन्वेस्ती या अतिशय सुंदर गावात राहते. तिचे लग्न १० व्या वर्षी झाले पण मुलीचे लग्न इतक्या लवकर होऊ नये, तिने शिक्षण घ्यावे असे रीफ्फाला वाटत होते. पण परंपरेपुढे तिचे काही चालले नाही. या जमातीत लग्न लौकर करण्यामागे मुलीचे कौमार्य राहते असा विचार असून मुलीने मुलाला हुंडा देण्याची प्रथाही आहे.

Leave a Comment