‘बिग बँग’नंतर ब्रह्मांडात झाला दुसरा सर्वात मोठा महास्फोट

खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 39 कोटी प्रकाशवर्ष लांब ब्रह्मांडात सर्वात मोठा स्फोट झाल्याचा शोध लावला आहे. हा बिग बँगनंतरचा सर्वात मोठा स्फोट असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटाचा शोध घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी पुण्यातील विशाल मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, नासाचे चंद्रा एक्स-रे ऑब्जवेटरी आणि यूरोपियन स्पेस एजेंसीच्या रेडिओ टेलिस्कोपचा वापर केला.

याद्वारे समोर आले की, हा स्फोट ओफियुकस आकाशगंगेच्या समुहात झाला असून, जे पृथ्वीपासून 39 कोटी प्रकाशवर्ष लांब आहे. खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, स्फोट आकाशगंगा एमएस 0735+74 मध्ये झाला. यामुळे 5 पट अधिक उर्जा निर्माण झाली.

Image Credited – BBC Science Focus

ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन यूनिवर्सिटीच्या मेलानी जॉनस्टन होलिट यांनी सांगितले की, आजपर्यंत आकाशगंगेत अनेक स्फोट पाहिले आहेत. मात्र हा स्फोट खूपच मोठा होता.

दरम्यान, नासाच्या कॅप्लर सेटेलाइटने 4 वर्षात 17 नवीन उपग्रह शोधले आहेत. यात पृथ्वीसारखा मानवी जीवन शक्य असलेला केआयसी-7340288 बी ग्रहाचा देखील समावेश आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा दीडपट मोठा आहे.

Leave a Comment