होळीच्या निमित्ताने चालविल्या जाणार 26 विशेष रेल्वे

होळीच्या निमित्ताने तुम्ही जर घरी जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सणा निमित्त प्रवाशांना गर्दीचा सामना न करता व्यवस्थित घरी जाता यासाठी मध्ये रेल्वेने 26 अतिरिक्त विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे मुंबई आणि पुण्यावरून उत्तर भारतासाठी चालतील.

होळीच्या निमित्ताने या रेल्वे 5 मार्च ते 15 मार्च दरम्यान चालणार असून, या रेल्वेसाठी बुकिंगची सुविधा 29 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून या सर्व रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे.

मध्य रेल्वेने सांगितले की, चार साप्ताहिक विशेष रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटणा, एलटीटी-वाराणसी, एलटीटी-मऊ आणि पुणे-दानापूर या मार्गावर चालतील. 10 अतिरिक्त रेल्वे या पुणे आणि बालहारशाह या मार्गावर चालतील. या रेल्वेमध्ये एक सेकेंड एसी, 5 एसी थर्ड क्लास, 8 स्लीपर आणि 6 जनरल सेकेंड क्लास डब्बे लावलेले असतील.

Leave a Comment