हा आहे कुस्तीच्या आखाड्यातला ‘मायकल जॅक्सन’

‘किंग ऑफ पॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकल जॅक्सनच्या निधनाला जवळपास 11 वर्ष होऊन गेली आहेत. मात्र आजही तरूणाईमध्ये त्याच्याबद्दलची क्रेझ दिसून येते. मायकल जॅक्सनप्रमाणे डान्स करण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र एका रेसलरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा रेसलर चक्क मायकल जॅक्सनचे डान्स स्टेप्स कॉपी करत आपल्या प्रतीस्पर्ध्याला मारत आहे.

हा रेसलिंग व्हिडीओ ब्राझीलचा असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी देखील या रेसलरच्या हटके स्टाईलने प्रभावित झाले आहेत.

आतापर्यंत या व्हिडीओला 8 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर हजारो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या रेसलरचे नाव सँथाना जॅक्सन असून, तो मूळचा अमेरिकेच्या लॉस एंजिलेस येथील आहे.

सँथाना जॅक्सनच्या डान्स स्टेप्स आणि रेसलिंग करताना पाहणे लोकांना आवडते. त्याचे डान्स व रेसलिंग दोन्हींवर प्रेम आहे. तर तो मायकल जॅक्सनचा चाहता आहे. त्यामुळे तो रिंगमध्ये मायकल जॅक्सन सारखा ड्रेस परिधान करून येतो.

Leave a Comment