ही 25 वर्षांची मुलगी चक्क घालते डायपर

जगात अनेक विचित्र प्रकारची लोक आढळतात. अनेकांना प्रौढ झाल्यानंतर देखील आपण एखाद्या लहान मुलासारखे वागताना पाहत असतो. लहान मुलांना तुम्ही अनेकदा डायपर घातलेले पाहिले असेल, मात्र एखाद्या प्रौढ व्यक्तीला तुम्ही कधी डायपर घातलेले पाहिले आहे ? कदाचित तुमचे उत्तर नाही असेल. मात्र एक 25 वर्षीय मुलगी आजही डायपर घालते.

25 वर्षीय पैजी मिलर (Paigey Miller) ही कॉन्टेंट क्रिएटर आजही डायपर घालते व एखाद्या लहान मुलासारखे आयुष्य जगते. ती एबीडीएल (अडल्ट बेबी डायपर लव्हर्स) समुदायाशी येते. महिन्याला ती आपल्या डायपर्ससाठी 21 हजारांपेक्षा जास्त खर्च करते. विशेष म्हणजे झोपण्यासाठी तिच्याकडे स्वतःचा पाळणा देखील आहे.

तिच्या दिवसाची सुरूवातच पाळण्यातून उठून डायपर बदलण्यापासून होते. दिवसभर ती आपल्या खेळण्याशी खेळत असते व सोशल मीडिया फॉलोअर्ससाठी कॉन्टेंट तयार करत असते. रिपोर्टनुसार, तिची स्वतःची एबीडीएल समुदायासाठी एक स्बस्क्रिप्शन सर्व्हिस देखील आहे. ज्याद्वारे तिला पैसे मिळतात.

https://www.instagram.com/p/B87t2nlD9Lt/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या या विचित्र राहणीमानाबद्दल मिलर म्हणते की, मला नेहमीच खेळणी जमा करण्याची सवय होते व एक वेगळा सेंस ऑफ ह्युमर होता. त्यामुळे माझ्या सर्व मित्र व कुटुंबाने मला सांभाळून घेतले.

तिने मे 2018 मध्ये एखाद्या प्रौढ बाळाप्रमाणे वागण्यास सुरूवात केली. तिने युट्यूब चॅनेल आणि वेबसाईट देखील सुरू केली.

तिला दररोज शेकडो नकारात्मक कमेंट्स येतात. मात्र त्यासोबतच ती जशी आहे, तशीच सार्वजनिक आयुष्यात वावरते, यासाठी तिला धन्यवाद देणारे अनेक ईमेल्स देखील येतात.

मिलरने आपल्या समुदायबद्दल सांगितले की, आम्हाला खेळण्यांबरोबर खेळायला आवडते. लहानपणी ज्या गोष्टींनी आनंद व्हायचा, त्याच गोष्टींपासून आम्ही आता आनंद घेत आहोत. मी पॉली पॉकेट आणि बाहुल्या देखील जमा करते. मला माझ्या प्राण्यांबरोबर खेळायला आवडते.

तीचे हे विचित्र राहणीमान असले तरी तिने सांगितले की, मी मागील 5 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे. तो माझ्यासारखा राहत नाही. मात्र तो मला पाठिंबा देतो.

Leave a Comment