अरे देवा ! जेसीबीचा असा पण वापर

जेसीबीचा वापर सर्वसाधारणपणे जगभरात उत्खननासाठी केला जातो. मात्र भारतात जेसीबीची काहीशी वेगळीच क्रेझ आहे. येथे जेसीबीची वापर उत्खननासाठी तर केलाच जातो, मात्र इतर बरीच कामे याद्वारे केली जातात.

सध्या सोशल मीडियावर जेसीबीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मशीनचा वापर ज्या कामासाठी केला आहे, त्याचा विचार देखील तुम्ही कधी केला नसेल. हे पाहुन भारतीय जुगाड करण्यात मागे नाहीत, असेच तुम्हाला वाटेल.

Use of JCB which Japanese and Americans still do no know.. 😄😄

Posted by Sandeep Joshi on Saturday, February 22, 2020

वरील व्हिडीओला संदीप जोशी नावाच्या एका युजरने फेसबुकवर शेअर केले आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन लिहिले की, जपान आणि अमेरिकेमध्ये देखील जेसीबीचा असा वापर करणे माहित नसेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ बघितला आहे. तर 11 हजार जणांनी या व्हिडीओला शेअर केले आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रकमधील महिलांना खाली उतरवण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. जेसीबीमधून उतरल्यानंतर महिला देखील स्वतःचे हसू रोखू शकत नाहीत.

या व्हिडीओवर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment