होली साठी बाजारात आले फटाका रंग


देशभरात लवकरच होली किंवा रंगपंचमीची धूम माजणार असून विविध शहरातील बाजार होलीसाठी लागणाऱ्या सामानाने सजले आहेत. त्यात सर्वधिक मागणी असलेल्या रंगाचा बाजार विशेष सज्ज असून यंदा प्रथमच फटाका रंग बाजारात दाखल झाले आहेत. देशात दिवाळीत फटके उडविले जातात पण यंदा होळीतही रंगाच्या फटक्यांची आतषबाजी दिसेल. हे रंग आत्ताच लोकप्रिय झाले आहेत.


फोटो सौजन्य यु ट्यूब
गुलाल फटाका या नावाने बाजारात आलेले हे रंग म्हणजे फटाक्याचा आवाज आणि गुलालाची उधळण असा प्रकार आहे. म्हणजे फटक्यातून गुलाल उडेल. यंदा रंग खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिचकाऱ्याही विशेष प्रकारच्या असून त्यात पाणी न घालताही रंग उडविता येणार आहेत. त्याचबरोबर डीओ स्वरुपात कलरस्प्रे सुद्धा बाजारात दाखल झाले आहेत.

आणखी एक नवा प्रकार म्हणजे अग्नीशमन यंत्र. त्यातून पाणी किंवा आग विझाविणारी रसायने उडणार नाहीत तर रंग उडतील. या रंगांमुळे कपडे अथवा शरीराला कोणतेही नुकसान होणार नाही. लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, टॉम आणि जेरी असे विविध प्रकारचे मास्क बाजारात आले आहेत. पाणी बचत करणारे रंग प्रथमच बाजारात आल्याने या वेळची होली वेगळी ठरेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment