विविध ठिकाणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. एलेआयसीपासून ते सी डॅकपर्यंत अनेक जागांसाठी भरती करण्यात येत आहे. या पदांबाबत जाणून घेऊया.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था –

येथे सायंटिस्ट बी आणि सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट ए पदासाठी 495 जागांची भरती होत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पदवी (इंजिनिअरिंग) आणि पदव्युत्तर (संबंधित शाखा) असणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च 2020 असून, अधिक माहितीसाठी उमेदवार https://www.calicut.nielit.in/nic/ या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

नॉर्दन कोलफील्ड्स लिमिटेड –

येथे डंपर ऑपरेटर, डोजर ऑपरेटर आणि अन्य पदांकरिता 307 जागा भरण्यात येत आहेत. यासाठी पात्रता 1वी पास, आयटीआय आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2020 आहे. अधिक माहितीसाठी http://nclcil.in/ ला भेट देऊ शकता.

एलआयसी –

एलआयसीमध्ये 218 जागांची भरती करण्यात येत असून, असिस्टेंट इंजिनिअर, असिस्टेंट आर्किटेक्ट औआणिर असिस्टेंट अडमिनिस्ट्रेटिव्ह पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवार पदवीधर, पदव्युत्तर आणि सीए असणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारखी 15 मार्च असून, पात्र व इच्छुक उमेदवार अधिक माहिती व अर्जासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

सी डॅक, नोएडा –

येथे प्रॉजेक्ट मॅनेजर अँड प्रॉजेक्ट इंजिनिअर पदांकरिता 132 जागांची भरती करण्यात येत असून, या करिता शैक्षणिक पात्रता बीई/बीटेक/एमसीए/एमई/एमटेक/पीएचडी असणे अनिवार्य आहे. अर्जाची अंतिम तारीख 11 मार्च 2020 असून, अधिक माहितीसाठी उमेदवार cdac.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

नाबार्ड कंसल्टेंसी सर्व्हिसेज –

नाबार्डमध्ये ज्यूनिअर आणि सिनिअर कंसल्टेंट पदांकरिता 78 जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदवी, पदव्युत्तर आणि एमबीए असणे आवश्यक आहे. उमेदवार 10 मार्च 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहिती व अर्जासाठी http://www.nabcons.com/ या वेबसाईटला भेट द्यावी.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था –

येथे प्रोजेक्ट असिस्टेंट लेव्हल –I  करिता 75 जागा भरण्यात येत आहे. यासाठी शिक्षण बीएससी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/मायक्रोबायॉलजी/बायॉकेमिस्ट्री) असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2020 असून, इच्छुक उमेदवार https://www.neeri.res.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Leave a Comment