
नवी दिल्ली – पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक करण्यात आली असून रवी पुजारी खंडणीच्या वेगवेगळया गुन्ह्यांमध्ये भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. त्याने बॉलिवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना खंडणीसाठी धमकावले होते. आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.
सेनेगलमध्ये आवळल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या मुसक्या
कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेनेगलमध्ये आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ चे अधिकारीही त्यांच्या मदतीसाठी तिथे आहेत. हे वृत्त इकोनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजारीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. रवी पुजारीने भारतात परतायचे नसल्यामुळे कायदेशीर पर्याय अवलंबला होता.
खंडणी, हत्येसह २०० गुन्हे रवी पुजारीवर भारतात दाखल आहेत. त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉनर्र नोटीसही जारी केली होती. त्याच्यावर बॉलिवूड कलाकार, उद्योगपतींना खंडणीसाठी धमकावल्याचे आरोप आहे. रवी पुजारी सेनेगलमध्ये अँथोनी फर्नानडीस हे नाव धारण करुन राहत होता.
