गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये जेवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष


नवी दिल्ली – उद्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत असून दिल्ली आणि अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. दिल्ली प्रवासादरम्यान ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण वाढले जाणार आहे.

ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे अशी माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. तीन आठवडयांमध्ये ३५ जणांच्या टीमने सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली आहे. वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.

Leave a Comment