जिओने लाँच केले 49 आणि 69 रुपयांचे दोन स्वस्त प्लॅन


मुंबई : आपल्या युजर्सासाठी रिलायन्स जिओने दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. 49 रुपये आणि 69 रुपये या प्लॅनची किंमत आहे. हा प्लॅन कंपनीने यापूर्वीही लाँच केला होता, पण तो हटवून पुन्हा हा प्लॅन रिलाँच केला आहे. तसेच या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये घट करण्यात आली आहे.

जिओ टू जिओ व्हॉईस कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंगसाठी 250 मिनिट, 2 जीबी 4जी डेटा आणि 25 एसएमएस जिओच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिले जाणार आहेत. तसेच या प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांची आहे.

जिओच्या 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्स जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट, 25 एसएमएससह 7 जीबी डेटा दिला जाईल. या प्लॅनची व्हॅलिडीटीही 14 दिवसांची आहे. या दोन्ही प्लॅनचे रिचार्ज जिओच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

दरम्यान, जिओ फोनच्या ग्राहकांसाठी याव्यतिरिक्त 75, 125, 155 आणि 185 रुपयांचेही चार प्लॅन उपलब्ध आहेत. जिओच्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, इतर नेटवर्कसाठी 500 मिनिट, 50 एसएमएस, या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.

Leave a Comment