अरबी समुद्रात कोसळले हवाई दलाचे MiG-29K फायटर विमान


नवी दिल्ली – रविवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे मिग-२९ के हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. हे फायटर विमान गोव्याच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात कोसळले. वैमानिक सुरक्षितरित्या बाहेर पडल्याने सुदैवाने बचावला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.

हा अपघात सकाळी १०.३० च्या सुमारास झाला. नियमित सरावासाठी या विमानाने उड्डाण केले होते. वैमानिक वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने बचावला. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली. या मिग-२९ के विमानाने गोव्यातील वास्कोमधील आयएनएस हंसा बेसवरुन उड्डाण केले होते. गोव्याच्या दाबोलिम विमानतळावरुन मागच्यावर्षी सुद्धा उड्डाण केलेले एक मिग-२९के विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळले होते.

Leave a Comment