सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या चाहत्यांना इंस्टाग्राम पोस्टद्वारे एक सुखद धक्का दिला आहे. शिल्पाने इंस्टाग्राम पोस्टद्वारे बाळाच्या जन्माची माहिती देत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
शिल्पाने 15 फेब्रुवारीला सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला आहे. शिल्पाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळ आपल्या आईचा हात पकडताना दिसत आहे. शिल्पाचे हे दुसरे मुल आहे.
शिल्पा शेट्टीने आपल्या या बाळाचे नाव ‘समीशा’ ठेवले आहे. पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, ओम श्री गणेशाय नम:, आमच्या प्राथनेला उत्तर एका चमत्काराद्वारे मिळाले. आमच्या घरी एका परीच आगमन होत असल्याचे सांगताना आनंद होत आहे.
शिल्पाने समीक्षा नावाचा अर्थ देखील सांगतिला आहे. तिने लिहिले की, ‘स’ चा संस्कृत अर्थ ‘घेणे’ आणि ‘मीशा’चा रशियन भाषेत अर्थ ‘देवासारखे’. आमची लक्ष्मी, जिने आमचे कुटुंब पुर्ण केले.
शिल्पाची ही पोस्ट व्हायरल होत असून, चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009 साली विवाह केला होता.