कार्यक्रमाच्या वेळी मार्क झुकेरबर्ग करायचा ही विचित्र गोष्ट !

फेसबुक संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग सध्या एका विचित्र गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपुर्वीच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, मार्कने आर्मपिटचा (काख) घाम सुकवण्यासाठी एक टीम ठेवली होती.

स्टिव्हन लॅव्ही यांनी लिहिलेल्या फेसबुक द इनसाइड स्टोरी या पुस्तकात हा दावा करण्यात आलेला आहे. स्टिव्हन हे टेक्नोलॉजी पत्रकर असून, त टेक्नोलॉजी मॅग्झिन वायर्डचे संपादक आहेत.

स्टिव्हन यांच्याकडे मार्क झुकरबर्गने 2006 साली लिहिलेल्या खाजगी डायरीची देखील माहिती असल्याचा दावा करण्यात येत आहे.

स्टिव्हन यांच्या पुस्तकात झुकरबर्गच्या खाजगी आयुष्याबाबत अनेक खुलासे करण्यात आलेले आहेत. त्यांनी लिहिले की, मुलाखत, भाषणे या सारख्या मोठ्या कार्यक्रमांच्या आधी मार्क नर्व्हस होत असे, ज्यामुळे त्याला घाम यायचा. यासाठीच त्याने एक टीम ठेवली होती.

पुस्तकात लिहिले आहे की झुकरबर्गची कम्युनिकेशन टीम एखाद्या इव्हेंटच्या आधी आर्मपिटच्या घामाला सुकवण्याचे काम करत असे. मात्र फेसबुकचे प्रवक्ते लिज बुर्जह यांनी सांगितले की, हे सत्य नाही. कारण हे जर खरे असते तर हे कम्युनिकेशन टीमच्या सांगण्यावरूनच केले गेले असते.

Leave a Comment