हवामान बदल रोखण्यासाठी बेझॉस देणार 10 अब्ज डॉलर

जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांनी हवामान बदल रोखण्यासाठी 10 अब्ज डॉलर (जवळपास 71 हजार कोटी रुपये) देणार असल्याची घोषणा केली आहे.

जेफ बेझॉस यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिली की, आज मला बेझॉस अर्थ फंडला लाँच करताना आनंद होत आहे. हवामान बदल पृथ्वीसाठी मोठा धोका आहे. मला हवामान बदल रोखण्यासाठी आतापर्यंतच्या पद्धती आणि याच्याशी लढण्यासाठी नवीन पद्धतींसाठी काम करायचे आहे. यासाठी हवामान बदल वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ यांना फंड दिला जाईल. आपण पृथ्वीला वाचवू शकतो. हे अभियान कंपनी, देश, जागतिक संघटना आणि व्यक्तिगत स्तरावर सर्वांना एकत्र आणेल.

View this post on Instagram

Today, I’m thrilled to announce I am launching the Bezos Earth Fund.⁣⁣⁣ ⁣⁣⁣ Climate change is the biggest threat to our planet. I want to work alongside others both to amplify known ways and to explore new ways of fighting the devastating impact of climate change on this planet we all share. This global initiative will fund scientists, activists, NGOs — any effort that offers a real possibility to help preserve and protect the natural world. We can save Earth. It’s going to take collective action from big companies, small companies, nation states, global organizations, and individuals. ⁣⁣⁣ ⁣⁣⁣ I’m committing $10 billion to start and will begin issuing grants this summer. Earth is the one thing we all have in common — let’s protect it, together.⁣⁣⁣ ⁣⁣⁣ – Jeff

A post shared by Jeff Bezos (@jeffbezos) on

हवामान बदल रोखण्यासाठी अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी बेझॉस यांच्यावर फंड देण्यासारखे अभियान सुरू करावे यासाठी दबाव आणला होता. मागील वर्षी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, कंपनीचा प्रयत्न असेल की 2030 पर्यंत 100 टक्के उर्जा ही सोलर पॅनेल आणि इतर पुन्हा वापरण्यात येणाऱ्या स्त्रोतांद्वारे निर्माण केली जाईल. 1 लाख इलेक्ट्रिक व्हिक्लस खरेदी करण्याची देखील घोषणा करण्यात आली होती.

Leave a Comment