इंदूरची स्वच्छता पाहून आनंद महिंद्रा काय म्हणाले पहा

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असणारे उद्योगपती आनंद महिंद्रा इंदूर शहराच्या स्वच्छतेने प्रभावित झाले आहेत. स्वच्छता सर्वेक्षणात गेली तीन वर्षांपासून इंदूर शहराने बाजी मारली आहे. इंदूर शहरात स्वच्छतेसाठी छोट्या छोट्या गोष्टींबाबत घेण्यात येणाऱ्या काळजीने महिंद्रा देखील प्रभावित झाले.

कनुप्रिया नावाच्या एका ट्विटर युजरने भाजी मार्केटमध्ये कचऱ्यासाठी ठेवलेल्या डब्ब्यांचे फोटो शेअर केले होते. हे ट्विट रिट्विट करत महिंद्रा यांनी लिहिले की, इंदूर कशाप्रकारे बदलले आहे याचेच हे प्रमाण आहे.

ट्विटमध्ये शेअर करण्यात आलेले फोटो हे इंदूर एमआर-9 आणि स्कीम नंबर 78 मधील भाजी मार्केटचे आहेत. जेथे कचऱ्यासाठी डब्बे ठेवण्यात आले आहेत व त्याभोवती रांगोळी काढण्यात आलेली आहे.

यासोबत आनंद महिंद्रांनी इंदूरबाबत आणखी एक ट्विट करत आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्ट देखील शेअर केली.

महिंद्रांनी ट्विट केले की, दशकांपुर्वी जेव्हा मी माझ्या पत्नीला इंदूरमध्ये भेटलो होतो, त्यावेळी एक विद्यार्थी चित्रपट बनवत होतो. त्यावेळी शहर खूपच अस्वच्छ होते. मात्र शहरात झालेला बदल खूपच चमत्कारी असून, यावरून सिद्ध होते की जेथे इच्छा आहे तेथे मार्ग नक्की सापडतो. मोर पॉवर टू यू, इंदूर , यू आर मॉय मंडे मोटिव्हेशन.

इंदूरचे आमदार रमेश मेंडोला यांनी देखील महिंद्रांच्या ट्विटला उत्तर देत लिहिले की, आता स्वच्छ इंदूरच्या नागरिकांसाठी एक धर्म झाला आहे. इंदूरचा प्रत्येक व्यक्ती साफसफाईसाठी जागृक आहे. म्हणून इंदूर नंबर 1 आहे.

Leave a Comment