..अन् कर्मचाऱ्यांसोबत थिरकल्या कंपनीच्या सीईओ

वेल्सपन इंडिया लिमिटेडच्या सीईओ दीपाली गोयंका यांनी ऑफिसमध्ये असे काही केले की, सध्या सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतूक होत आहे. 50 वर्षीय दीपाली गोयंका ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसोबत बॉलिवूड गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडीओ आरपीजी इंटरप्रायजेझचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी शेअर केला असून, हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ऑफिसमध्ये त्यांनी ‘स्ट्रीट डान्सर 3डी’ या चित्रपटातील ‘मुकाबला’ या गाण्यावर डान्स केला. त्यांच्यासोबत कर्मचारी देखील डान्स करत होते. शेवटी कर्मचारी त्यांच्या डान्ससाठी टाळ्या देखील वाजवतात.

व्हिडीओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी लिहिले की, ऑफिसमध्ये एखाद्या सीईओला डान्स करताना पाहणे दुर्मिळच आहे. अशाच प्रकारे चांगले वातावरण तयार करता येते.

दीपाली गोयंका यांनी देखील या व्हिडीओला रिट्विट करत शेअर करण्यासाठी हर्ष गोयंका याचे आभार मानत लिहिले की, मलाही तुमचे वर्कप्लेस नक्कीच बघायला आवडेल.

या व्हिडीओला आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिकवेळा पाहण्यात आले आहे. नेटकरी देखील दीपाली गोयंकांचे कौतूक करत आहेत.