ठरले… या तारखेला लाँच होणार पहिला 5G स्मार्टफोन


स्मार्टफोन वापरणाऱ्या युझर्ससाठी खुशखबर आहे. कारण भारतात लवकरच पहिला 5G स्मार्टफोन लाँच होणार आहे. 24 फेब्रुवारीला शाओमीची सब-ब्रँड कंपनी रिअलमी आपला रिअलमी X50 Pro हा पहिला 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये कंपनी हा फोन लाँच करणार होती, पण बार्सिलोनामध्ये होणारा हा कार्यक्रम कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे पुढे ढकलण्यात आला. आता माध्यमांना या कार्यक्रमासंदर्भातील निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात फोनची लाँचिंग करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे, iQoo 3 हा स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे iQoo या चिनी कंपनीनेही जाहिर केले असून तो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन असेल असा दावा करण्यात आला आहे. पण हा फोन कंपनी 25 फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. रिअलमी आणि iQoo या दोन्ही कंपन्यांची पॅरेंट कंपनी बीबीके इलेक्ट्रॉनिक्स असून ती चिनीच आहे.

क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 सह 20 एक्स हायब्रिड झूम फीचर रिअलमी एक्स२ प्रो मध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन काम करेल, तसेच फोनमध्ये 6 कॅमेरे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर फोनमध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी असेल, तसेच 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत UFS 3.0 स्टोरेज असू शकतो. यात ड्युअल सेल्फी कॅमेरा असू शकतो असे फोनच्या टीझरवरून स्पष्ट होते. या फोनच्या लाँचिंगबाबत ट्विटरद्वारे रिअलमी कंपनीने माहिती दिली आहे. भारतातील हा पहिला 5G स्मार्टफोन असला तरी अद्याप भारतात 5जी सेवा सुरू झालेली नसल्यामुळे ही सेवा कधी सुरू होणार हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे.

Leave a Comment