या बौद्ध मंदिरात चक्क प्लास्टिकपासून बनविले जात आहेत कपडे

थायलंडमधील एक बौद्ध मंदिर पर्यावरणात वाढणाऱ्या प्लास्टिक प्रदुषणाला कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथील भिक्षू प्लास्टिक कचऱ्यापासून धागे बनवून त्याद्वारे कापड निर्मिती करत आहे. याच भगव्या वस्त्रांना ते परिधान करतात.

हे भिक्षू जगभरात पसरलेल्या आपल्या समुदायाला याबाबत जागृक करत आहेत. बौद्ध भिक्षूंच्या शिक्षणाचे केंद्र असलेले हे मंदिर आज प्लास्टिक रिसायक्लिंगसाठी ओळखले जात आहे. अनेक कॉर्पोरेशन्स, एनजीओ आणि सेलिब्रेटीज सामाजिक जबाबदारी निभवण्यासाठी या मंदिराच्या कार्यक्रमात भाग घेतात.

थायलंडची राजधानी बँकॉकपासून 30 किमी अंतरावरील वाट चक डाइंग नावाच्या या बौद्ध मंदिरात भिक्षू आणि भाविकांमध्ये पर्यावरणावर सर्वाधिक चर्चा होत असते. आतापर्यंत 40 टन प्लास्टिक रिसायकल्ड करण्यात आले आहे. भाविक मंदिरात पैसे अथवा अन्नदान करतात त्यावेली भिक्षू त्यांच्याकडे प्लास्टिक कचरा देखील मागतात. भाविक देखील प्लास्टिकच्या बाटल्या व अनेक प्रकारचे प्लास्टिक देतात.

मंदिरातील वरिष्ठ भिक्षू 56 वर्षीय फ्रा टिपाकोर्न एरियो सांगतात की, आम्हाला लोकांना हे शिकवण्याची गरज आहे की ते कशाप्रकारे पर्यावरण बदलू शकतात. मंदिराला सर्वाधिक प्रसिद्धी प्लास्टिकद्वारे बनविण्यात येणाऱ्या कापडांमुळे मिळाली आहे. प्लास्टिकद्वारे कपडे बनविण्याचा विचार 3 वर्षांपुर्वी आला होता.

मंदिरात एका भिक्षूकाने सांगितले की त्याने प्लास्टिकद्वारे बनलेले वस्त्र घातले आहे. त्यानंतर आम्ही दान स्वरूपात प्लास्टिक घेण्यास सुरूवात केली. मंदिराने यासाठी मोठी रिसायक्लिंग मशीन घेतली. हे काम स्थानिक लोकांद्वारे केले जात आहे, ज्यामुळे त्यांना रोजगार देखील मिळत आहे. मंदिरात कपड्यांव्यतरिक्त कंपन्यांबरोबर मिळून प्लास्टिक कचऱ्याद्वारे पेन्सिल, केस, बुट, नाव अशा अनेक गोष्टी बनवल्या जात आहेत.

Leave a Comment