शाहरुख कन्येला लाँच करणार करण जोहर


लवकरच बिग बॉसचा लोकप्रिय स्पर्धक असिम रियाझसोबत शाहरुख खानची मुलगी सुहाना स्क्रिन शेअर करणार असल्याची बातमी असून सोशल मीडियामुळे नेहमी चर्चेत असलेली सुहाना चित्रपटात झळकण्याच्या स्वप्नांच्या जवळ पोहोचली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेहमी स्टार किड्सना लाँच करण्यासाठी बॉलीवूडचा डॅडी अर्थात करण जोहर हा ओळखला जातो. आता सुहानाला लाँच करण्याचा विडा त्याने उचलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगामी ‘स्टू़डेंट ऑफ द ईयर 3’ या चित्रपटाद्वारे असिम आणि सुहाना बॉलीवूडमध्ये प्रवेश करतील.

‘स्टू़डेंट ऑफ द ईयर’ फ्रॅन्चाइजमधून आतापर्यंत करण जोहरने आलिया भट्ट, वरुण धवन, सिध्दार्थ मल्होत्रा, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांना प्रकाशझोतात आणले आहे. करण जोहर सुहानाला लाँच करणार असल्याच्या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Leave a Comment