डिश टिव्हीच्या ग्राहकांना लाईफटाईम मिळणार ही सेवा

भारतात डीटीएच ऑपरेटर्स आपल्या ग्राहकांना नवनवीन सुविधा देत आहेत. डीटीएच ऑपरेटर्स अँड्राईडवर आधारित सेटटॉप बॉक्स लाँच करत आहेत. आता डिश टिव्हीने (Dish TV) देखील मोठी घोषणा केली आहे.

डिश टिव्हीने आपल्या ग्राहकांना सेटटॉप बॉक्ससोबत लाईफटाईम वॉरंटी देणार असल्याची घोषणा केली आहे. ही सुविधा स्टँडर्ड डेफिनेशन आणि हाय डेफिनेशन या सेटटॉप बॉक्ससोबत मिळेल.

नवीन ग्राहकांसाठी कंपनी DishNXT, DishNXT HD आणि Dish SMRT Hub असे तीन सेटटॉप बॉक्स देत आहे. यातील Dish SMRT Hub सेटटॉप बॉक्सवर एक वर्षाची वॉरंटी मिळेल. तर अन्य दोनवर लाईफटाईम वॉरंटी देण्यात आली आहे. ही सुविधा केवळ नवीन ग्राहकांसाठी आहे.

किंमतीबद्दल सांगायचे तर DishNXT ची किंमत 1,490 रुपये आहे..  तर DishNXT HD ची किंमत 1,590 रुपये आणि Dish SMRT Hub ची  किंमत 3,999 रुपये आहे.

डिश टिव्ही आपल्या ग्राहकांना एक महिन्याचे स्बस्क्रिप्शन देखील मोफत देत आहे. तुम्ही DishNXT चा HD सेटटॉप बॉक्स खरेदी केल्यास, तुम्हाला एका चॅनेलचा पॅक एक महिन्यासाठी मोफत मिळेल.

Leave a Comment