नव्या पोस्टरसह समोर आली ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ची रिलीज डेट


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला कारगिल युद्धात आपल्या शौर्याने सर्वांना भारावुन टाकणाऱ्या लढवय्या गुंजन सक्सेना यांच्या पराक्रमाची कथा उलगडणारा ‘कारगिल गर्ल’ हा चित्रपट देखील येणार असून नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटात भारतीय वायु दलातील वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. ती गुंजन सक्सेना यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक याआधी रिलीज करण्यात आला होता. दिग्दर्शक शरन शर्मा हे ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे. हा चित्रपट २४ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होईल.

Leave a Comment