केर्न्‍स चषक जिंकत जागतिक क्रमवारीत कोनेरु हम्पीची मोठी झेप


नवी दिल्ली – केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धा भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने जिंकली असून अंतिम फेरीत भारताच्याच द्रोणावल्ली हरिकाशी तिने बरोबरी साधत विजेतेपदाला गवसणी घातली. हे केर्न्स चषक स्पर्धेचे दुसरे हंगाम असून या स्पर्धेत हम्पी पहिल्यादांच उतरली होती. हम्पीने या विजयासह खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले.

जॉर्जियाच्या नॅना झॅगनिड्झेचा पराभव करत हम्पीने पाच गुण मिळवल्यानंतर तिने आठव्या फेरीत रशियाच्या वॅलेंटिना गुनिनाचा पराभव करत विजेतेपदाचा दावा मजबूत केला. तिचे ५.५ गुण झाले होते. हम्पीसमोर विजेतेपदाच्या शर्यतीत रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकचे आव्हान होते. हम्पीने अंतिम फेरीत हरिकाशी बरोबरी साधत जेतेपद पटकावले.

Leave a Comment