कोरोनानंतर आता ब्राझीलमध्ये आढळला ‘यारा’ व्हायरस

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसवरील लस अद्याप सापडली देखील नाही. मात्र त्याआधीच आणखी एक व्हायरस समोर आला आहे.

ब्राझीलच्या वैज्ञानिकांना ‘याराव्हायरस’ (Yaravirus) आढळला आहे. हा व्हायरस अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाला आवाहन देणारा ठरत आहे. ब्राझीलच्या बर्नार्ड लास्कोला आणि जोनाटास एस एब्राहाओच्या रिसर्च पेपर दरम्यान या व्हायरस बाबत माहिती समोर आली.

या व्हायरसमध्ये प्रोटीनला एकत्र करण्याची क्षमता आहे. हा व्हायरस स्वतःच्या डीएनएला दुरूस्त करतो व जिंवत राहतो.

रिसर्च पेपरनुसार, यारा व्हायरसला एमोईबल व्हायरसेसच्या कोणत्याही प्रकारात ठेवता येत नाही. हा व्हायरस अन्य व्हायरसच्या तुलनेत मोठा आहे. याच्या पार्टिकलचा आकार 80-एनएम आहे. हा व्हायरस ब्राझीलच्या पम्पुल्हा येथील एका कृत्रिम तलावात आढळला होता.

अद्याप या व्हायरसमुळे कोणताही आजार झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र या नवीन व्हायरसमुळे गेली अनेक दशकांपासून सुरू असलेल्या संशोधनाला एक नवीन दिशा मिळाली आहे.

Leave a Comment