भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर


वेलिंग्टन – न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला असून दुखापतीतून सावरलेल्या ट्रेंट बोल्टचे यात न्यूझीलंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. तर संघातून मिशेल सॅटरन या फिरकीपटूला डच्चू देण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरूवातीला ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात आली. भारताने या मालिकेत ५-० ने निर्भेळ यश मिळवल्यानंतर तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताला ३-० ने व्हाईटवॉश देत टी-२० मालिकेतील बदला घेतला. दरम्यान, उभय संघात आता २ कसोटी सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. २१ फेब्रुवारीपासून यातील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडने कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. ट्रेंट बोल्टचे यात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे बोल्ट संघाबाहेर होता. आता तो यातून सावरल्यानंतर भारताविरुद्ध पुनरागमन करणार आहे.

भारताचा कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा.

न्यूझीलंडचा कसोटी संघ – केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, निल वॅगनर आणि बीजे वॉलटिंग.

Leave a Comment