…यामुळे कोरेगाव-भीमाचा तपास एनआयएकडे वर्ग केला – शरद पवार


जळगाव – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोरेगाव-भीमा हे प्रकरण घडले होते. त्याची चौकशी महाविकास आघाडी सरकारकडून सुरू झाल्यामुळे केंद्र सरकार घाबरले आहे. केंद्र सरकारला या प्रकरणात काहीतरी झाकायचे असावे, म्हणूनच त्याचा तपास काही तासात राज्य सरकारकडून काढून घेत ‘एनआयए’कडे सोपवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावातील पत्रकार परिषदेत केला आहे.

पवार पुढे बोलताना म्हणाले की, केंद्राला त्याचा अधिकार असला तरी यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली नाही. राज्यात मध्यवधी निवडणुकीची चर्चा देखील निरर्थक असून आणखी चार वर्षे भाजपच्या नेत्यांचे ज्योतिष खरे ठरणार नसल्याचा दावा पवारांनी केला. महाविकास आघाडीचा मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळावा व जैन इरिगेशनतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दोन दिवसीय जळगाव दौऱ्यावर आले होते. शरद पवार यांनी रविवारी सकाळी जैन हिल्स येथे आयोजित पत्रकारांशी संवाद साधला.

Leave a Comment