सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची अरविंद केजरीवालांनी घेतली शपथ


नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा रामलीला मैदानावर आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. केजरीवाल यांना नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी गोपनीयतीची शपथ दिली. रामलीला मैदानावर यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केजरीवाल यांच्यासोबत मनिष सिसोदिया, गोपाल राय, कैलाश गेहलोत आणि इम्रान हुसैन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. आप समर्थकांनी शपथविधी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

तुमच्या मुलाने आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. हा फक्त माझा विजय नसून प्रत्येक आई, बहीण आणि दिल्लीकराचा विजय आहे. दिल्लीचा वेगाने विकास कसा होईल, हा सगळ्यांचा प्रयत्न आहे. केजरीवाल म्हणाले, दिल्लीकरांनो घरी फोन करून सांगा, कि तुमचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. आता निवडणुका झाल्या आहेत. काही लोकांनी आम्हाला तर काहींनी भाजप, काँग्रेसला मतदान केले कोणी कोणत्याही पक्षाचा समर्थक असू द्या, मी आता सर्वांचा मुख्यमंत्री आहे.

माझ्या कुटुंबाचा सर्व दिल्लीकर हिस्सा आहेत. कोणतेही काम असूद्या माझ्याकडे या. मी सर्वांचे काम निष्पक्षपातीपणे करेन. मी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. खूप राजकारण निवडणुकीवेळी झाले. जे काही विरोधकांनी आम्हाला म्हणाले, त्यांना मी माफ करतो. मी केंद्र सरकार बरोबर राहून दिल्लीला पुढे नेऊ इच्छितो, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीला जे नागरिक चालवतात. ते आज पाहुणे म्हणून येथे आले आहेत. दिल्लीला शिक्षक, रिक्षाचालक, विद्यार्थी, नोकरदार चालवत आहेत. आज हे नागरिक शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. येणार काळ भारताचे भविष्य असणार आहे.

Leave a Comment